Tuesday, February 26, 2013

Vigyan Ashram Pabal-Bhimashankar-pabal annual cycle rally

विज्ञान आश्रम पाबळ - भीमाशंकर -पाबळ सायकल यात्रा

दर वर्षीप्रमाणे या वर्षीही फ़ेब्रुवारी महिन्यात  विज्ञान आश्रम पाबळ यांनी पाबळ - भीमाशंकर - पाबळ सायकल  यात्रा आयोजित केली होती या मध्ये २ २ विद्यार्थी आणि ३ शिक्षक असे आम्ही २ ५ जण सहभागी झालो होतो

एक खडतर आणि दमछाक करणारा असा हा प्रवास असतो जो तीन दिवस चालणारा असतो
या यात्रेचा मार्ग असा होता

दिवस पहिला
सकाळी ४ वाजता  पाबळ हून निघणे आणि दुपारी ओझर ला पोहोचणे आणि संध्याकाळी लेण्याद्री ला जाउन जुन्नर मध्ये मुक्काम करणे त्या प्रमाणे आम्ही लेण्याद्री फाट्या जवळ तुकाराम मंदिर येथे मुक्काम केला

दिवस दुसरा
जुन्नर हून वडज धारण मार्गे घोडेगाव ला पोहोचून आणि भीमाशंकर चा पोखरी घाट चढून तळेघर ला पोहोचलो आणि तेथून भीमाशंकर ला जाणारा सरळ रस्ता सोडून  उजवीकडे सावरली कडे जाणारा दाट जंगलातला  रस्ता पकडून ७ किलोमीटर लांब असलेले सावरली गाव येथे पोहोचलो . येथे आमच्या विद्यार्थ्याचे घर होते तेथे आम्ही रात्रीचा मुक्काम केला

त्या रात्री आम्ही ७ ते ८ लोक दाट जंगलात चालत गेलो आणि एका पाणवठा जवळ रात्री ९ ते १ १ : ३ ० पर्यंत बसून विविध जनावरांची चाहूल घेत होतो ज्यामध्ये दोन रान डुक्कर चा कळप होता , दोन ते तीन उद मांजर होते , काही रान मांजरे होती आणि बरेच लांबवर  डोळे चमकत होते पण आम्ही अंधार करून गपचूप पाणवठा च्या अगदी कडेला बसून होतो आणि वारे कोणत्या दिशेला वाहतोय हे पाहून आमच्या जागा आवाज न करता बदलत होतो

दिवस तिसरा
सावरली हून पुन्हा एक डोंगर चढून आमच्या सायकल पर्यंत पोहोचून नंतर तळेघर गाठले आणि भीमाशंकर पर्यंत पोहोचलो
येथून दर्शन घेऊन आम्ही भीमाशंकर चे सर्वोच्च टोक नागफणी कडे निघालो
हनुमान तळे पासून सरळ एक रस्ता दाट जंगलातून जातो आणि साधारण १ ५ मिनिटात आपण नागफणी ला येउन पोहोचतो
येथून खाली लांब वर कोकण ,सिद्धगड , पदर किल्ला , खंडाळा , माथेरान चे दर्शन होते

दुपारी आम्ही पुन्हा सायकल वरती  निघालो आणि ५ कि मी पुढे गेलो असतांना जंगलात आम्हाला एक हरीण आणि ३ शेकरू (मोठी खार ) दिसले
सायकल वर असण्याचा हा फायदा आहे कि खूप जास्त गोंगाट होत नाही त्यामुळे प्राणी जवळून पाहता येतात

तळेघर पासून उजवीकडे राजगुरुनगर कडे वळलो आणि रात्र होई पर्यंत आम्ही चासकमान धारणा पर्यंत पोहोचलो
एक आनंदाची बात अशी आहे कि चासकमान  धरणाच्या पलीकडे जे जंगल आहे तिथे तिवरे  डोंगराच्या पलीकडे  नुकतेच पट्टेरी वाघ येथे आढळला आहे(एक मादी आणि २ पिल्ले ) . बिबटे पण येथे खूप आहेत
त्या पट्टेरी वाघाच्या  जंगलातून रात्रीचे जात आम्ही वेताळे गावी पोहोचलो आणि मुक्काम केला
शनिवारी सकाळी राजगुरुनगर ला पोहोचून नंतर दुपार पर्यंत पाबळ ला पुन्हा पोहोचलो


4:00 am at Vigyan Ashram Pabal Campus.Students and Teachers

Sheli Palan Institute Narayangaon

Sheli Palan Institute Narayangaon

Sheli Palan Institute Narayangaon

Cycling Team reaching Ojhar

Lenyadri

Our first day halt near Junnar


                                  DAY 2


Afternoon after Climbing Bhimashankar Pokhari ghat

Towards Savarli village our second day halt

Savarli village near backwaters of Dimbhe Dam.Here during night time,we spent 2 hours watching wild pigs,palm civets and possibly leopards also

Sunset




Shekaru or giant Indian squirrel in bhimashankar forests


Giant Indian Squirrel

savarli village where we stayed overnight

mirror image

Giant Indian Squirrel in Bhimashankar forests



Towards Nagphani point


Dense forest behind the temple.We spotted a deer here



From Nagphani point the highest point of Bhimashankar(1008 meters)


view of padar fort from Nagphani bhimashankar