Sunday, April 29, 2012

Siddhagad in the dense forests of Bhimashankar-Ahupe region

Siddhagad(982 meters)

Though it is 982 meters but dont go on these figures.The fact is that  konkan area is hardly 75 to 100 meters higher from sea level hence Siddhagad offers you a climb of 850 to 900 meters from ground(1.5 times higher than Torna,Rajgad,2 to 2.5 times higher than Raigad)
Siddhagad offers you climb almost equal to Kalsubai, Salher,Harishchandragad,Ajoba
One more thing is that after Alang-Kulang-Madan,Siddhagad can be also considered as one of the difficult treks in Sahyadris and why not. Walking 25 to 30 kms in one day by climbing up and down around 900 meters from ground and through dense forests plus the last rock patch on Siddhagad is almost 90 degrees elevated hence is certainly a difficult trek(I am also not considering summer afternoon of April for sake of simplicity)


Further details of trek narrated in Marathi


सिद्धगड : घन दाट भीमाशंकर अभयारण्यात एक बेधडक भटकंती 


आव्हानांनी भरलेल्या सह्याद्रीत अनेक प्रकारचे वैविध्याने नटलेल्या अनेक गोष्टी आहेत जशे कि
वैभवशाली गड कोट , एक विश्व सामावून टाकणाऱ्या डोंगर दऱ्या, जीव विविधतेने नटलेले अरण्य , वाऱ्याचा वेग अंगावर लीलया झेलणारे  कडे कापार्या आणि अनेक संकटांशी सामना करून देखील कीर कीर न करता  हसतमुख राहणारे तेथील स्थानिक  डोंगरपुत्र 

गड वेड्या माणसांची कथा (श्री पांडुरंग पाटणकर यांचा "चला  ट्रेकिंगला " या पुस्तका मध्ये हि प्रस्तावना आहे आणि त्याच्या पुढे माझे पण विचार मांडत आहे )
 एक गड वेडा माणूस  माणूस जन्म भर किल्ले भटकला , पावसात ,गोठवणाऱ्या थंडीत , रणरणत्या  उन्हात , दिवसा , रात्री तिन्ही सांजेला तो किल्ले चढला उतरला इतकेच काय तर चीरनिद्रा घेतल्यावर सुद्धा आपली रक्षा बेलग कड्या खाली , दऱ्या-खोऱ्यात उधळून टाकण्यात धन्यता मानली अशे थोर  गड वेडी  माणसे या सह्याद्रीला लाभली  
तर अशा या सह्याद्रीला नमन करून आणि त्या थोर माणसांना स्मरण करून लेख सुरु करत आहे
सिद्धगड  बद्दल

भौगोलिक दृष्ट्या सिद्धगड चा किल्ला हा भीमाशंकर आणि आहुपे घाट च्या घनदाटं जंगलात  आहे  आणि त्याला "भीमाशंकर पर्वत " सारखा सखा शेजारी लाभला आहे 
ठाणे जिल्ह्यातील नारिवली /उचले हि गावे त्याचा पायथ्याला आहे आणि हा किल्ला ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यात येतो .या किल्ल्या जवळ ठाणे ,पुणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांचा सीमा मिळतात

सिद्धगड हा एके काळी किल्ला  होता आणि शिवशाहीत देखील याचा उल्लेख आहे( शिवशाहीत किंवा पेशवाईत जरी या किल्ल्याचे कार्य मोठे नसेल पण या गडाचा उपयोग भीमाशंकर,कल्याण, माहुली ,नेरळ या भागांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असणार हे मात्र स्पष्ट आहे ) .हा गड एकदाही मोगलांच्या ताब्यात गेला नाही आणि  १८१८  मध्ये  जेव्हा ब्रिटिशांनी सह्याद्रीतले सगळे किल्ले जिंकून ताब्यात घेतले होते तरी देखील दोन किल्ले सिद्धगड आणि वासोटा अजून त्यांच्या हाती  लागत नव्हते.
शेवटी हतबल  ब्रिटिशांनी भीमाशंकर वरून तोफा सिद्धगड च्या शेजारी असणाऱ्या दमदम्या च्या डोंगरावर आणून  तिथून सिद्धगड वर तोफा डागल्या आणि १८२० साली सिद्धगड ब्रिटीशांच्या ताब्यात आला (वासोट्या बाबत असे होते कि ब्रिटिशांनी पेशवे आणि औंध संस्थान चे राजे यांच्या  मधील  भांडणाचा  लाभ  घेऊन  1821 मध्ये  वासोटा जिंकला होता )
पुढे नेरळ चे भाई कोतवाल ,मुरबाड चे हिराजी आणि गोमाजी पाटील बंधू हे तीन क्रांतिकारी यांची ब्रिटिशांनी इतकी धास्ती घेतली होती कि ब्रिटिशांना या भागात येण्याचे पण धैर्य होत नव्हते त्यामुळे सिद्धगड ते भीमाशंकर चा जंगलातला भाग  क्रांतिकारी लोक लपण्याचा भाग म्हणून वापरत असत पण शेवटी २ जानेवारी १९४३ रोजी रात्री भाई कोतवाल.आणि पाटील बंधू हे सिद्धगड जवळ हुतात्मा झाले .त्यांची समाधी सिद्धगड आणि भीमाशंकर च्या मध्ये आहे (सिद्धगड च्या दक्षिणी भागात).तुम्हाला हि सर्व माहिती त्या वेळचे ठाणे जिल्ह्याचे gazetteer मध्ये मिळेल 


तर वरील उदाहरणातून  तर तुम्हाला समजण्यात काहीच हरकत नाही कि सिद्धगड हा त्या काळी किती दुर्गम असेल (अगदी आज देखील तो दुर्गम आहे .म्हणजे एवढी वर्षे झाली तरी पण त्याचे दुर्गम पण त्या काळा पेक्षा  काकणा भर कमी झाला असेल एवढेच  )


आमचा ट्रेक 

 पुण्याहून मी आणि माझा शाळे  पासूनचा मित्र किरण गोसावी होतो आणि अंबरनाथ-बदलापूर हून किरणचे सासरे असे आम्ही तिघांनी हा ट्रेक करण्याचे ठरवले 
पुण्याहून आम्ही सकाळी ५;३० वाजता निघालो आणि कर्जत जवळ सकाळी ८:०० वाजता पोहोचलो  किरणचे सासरे हे कर्जत रेल्वे स्टेशन ला ७:३० ते ७:४५  वाजता आले होते
नंतर  आम्ही ८:१५  वाजता कर्जत हून निघालो


सह्याद्री हे उन्हाळ्यात गिर्यारोहण करण्यास अनुकूल नाहीत हे बऱ्याच लोकांचे मत खोडून काढायला हा ट्रेक पुरेसा आहे .सह्याद्रीत काही ठिकाणे आहेत कि जिथे उन्हाळ्यात देखील ट्रेक करता येऊ शकतो हे माझ्या ब्लॉग च्या माध्यमातून मी कित्येकदा दाखवून दिले आहे
उदा: हरिश्चंद्रगड . भीमाशंकर(कर्जत मार्गे खांडस  गावातून  ) ,सिद्धगड, आहुपे घाट , जुन्नर जवळचा दर्या घाट (दुर्ग -ढाकोबा) , रतनगड ,आजोबा , कोयना आणि वारणा धारणाच्या परिसरातले किल्ले (वासोटा ,प्रचीतगड ,भैरवगड उर्फ सारंग गड ,चकदेव ), प्रतापगड जवळचा मधु-मकरंद गड  हि अशी काही ठिकाणे अशी आहेत कि उन्हाची झळ इतर ठिकाणांच्या मानाने येथे कमी लागते

उन्हाळ्यात पण मी ट्रेक केले आहेत (रतनगड १ आणि २ मे २०१० , हरिश्चंद्रगड २२ मे २०११ आणि सिद्धगड २८ एप्रिल २०१२) आणि पुढच्या आठवड्यात येणारा वासोटा ट्रेक ५ मे २०१२ तर आहेच

कर्जत - मुरबाड रस्त्यावरून म्हसा मार्गे नारिवली पर्यंत पोहोचायला आम्हाला ९:३० वाजले .वाहन गावाबाहेर एका बँकेच्या आवारात लावून आम्ही १०:०० वाजता त्या खडतर ट्रेक साठी तयार झालो 
नारिवली गावातून समोर दिसणाऱ्या सिद्धगड, गोरखगड ,आहुपे घाटाचे चे एक भेदक दर्शन घेतले आणि आम्ही पुढे चालू लागलो 
नारिवली गावातून बाहेर पडून आम्ही एका बैलगाडीच्या रुळलेल्या वाटेवरून निघालो आणि एक छोटीशी नदी(कोरडे पात्र) ओलांडून पलीकडे असलेल्या दाट झाडीत प्रवेश केला 
हि रुळलेली वाट एका टेकडी खालून,दाट झाडीतून ,कधी सपाटीवरून तर कधी चढावरून जात जवळ जवळ ३ ते ४ कि मी नंतर एका शेतावर बांधलेल्या झापा पर्यंत घेऊन जाते 
येथून पुन्हा चढ उतार करत ती वाट पुन्हा दाट जंगलात प्रवेश करते 
आता पुढे एक खडी चढण सुरु होते आणि वाटेत एक जंगलात धबधब्याची  वाट  लागतो .ती कोरड्या पडलेल्या धबधब्याची  वाट ओलांडून पुढे अजून खूपच दाट जंगलात आपला प्रवेश होतो .आता तुम्हाला विविध प्रकारचे आवाज ऐकू येतात कधी वानरांचे तर कधी पक्ष्यांचे ,कधी कीटकांचे वगैरे (कमकुवत हृदय किंवा घाबरट लोकांसाठी आनंदाची  बातमी  आहे कि भीमाशंकर ते आहुपे-सिद्धगड च्या जंगलात बिबटे,अस्वल,रानडुक्कर अजिबात नाही .बिबटे तर या भागात  केव्हाच संपले आहेत,बाकी अस्वल पण नामशेष होण्याचा मार्गावर आहे(किंवा नामशेष झाले असतील ) त्यामुळे सहसा अस्वले तुम्हाला दिसणार नाही, रानडुक्कर फक्त  भीमाशंकर च्या पठारावर आहे पण त्यांची पण खूप शिकार होते शिवाय रानडुक्कर मारणे हा वन खात्या तर्फे गुन्हा नोंद होत नाही कारण शेतीला उपद्रव या कारणाखाली रानडुक्करला सर्रास पणे मारण्यात येते त्यामुळे रानडुक्कर देखील क्वचित दिसते(जवळ जवळ नाहीतच) .आता या जंगलात फक्त भेकर,हरीण,मोर, चंदेरी वानर आणि कुत्रे यांचा वावर आहे .त्यामुळे लोकांना घाबरण्याचे  काहीच कारण नाही. वाघ किंवा बिबट्याची डरकाळी किंवा अस्वलाचा चित्कार सोडा पण त्यांच्या पाउल खुणा देखील जंगलात दिसणार नाही)

या जंगलात कारंजाचे भरपूर झाडी आहेत . करंज वृक्षाचे एक वैशिष्ट्य आहे कि आजू बाजूला कितीही गर्मी असली तरी पण करंज वृक्षाच्या सावलीत  कायम गार वारेच लागणार (किरण चे सासरे या बाबत खूपच जाणकार आहेत त्यांच्या म्हणण्या प्रमाणे पूर्वीच्या काळी एखाद्या माणसाचा ताप उतरत नसेल तर त्या माणसाला कारंजाच्या सावलीत आणत असत आणि त्या माणसाचा ताप उतरायला लागत .हि गोष्ट १०० टक्के खरी  आहे आणि याचा  अनुभव मला  त्या दिवशी आला कारण जंगलात इतर ठिकाणी थोडीशी  गर्मी आणि दमटपणा असायचा पण कारंजाच्या सावलीत आल्यावर एक प्रकारचा  थंडावा स्पष्ट पणे जाणवत होता .आणि म्हणूनच कारंजाची भरपूर झाडी असल्यामुळे उन्हाची झळ भीमाशंकर अभयारण्यात तुम्हाला बसत नाही  )

कारंजाचे झाड फोटोत खालील प्रमाणे दाखवलेले आहे



या दाट जंगलातून वेगवेगळे आवाजांचा कानोसा घेऊन आणि जवळ जवळ १० ते १२ कि मी चालल्यावर  आणि नारिवली गावापासून अर्ध्याहून अधिक गड चढल्यावर(जमिनीपासून ६०० मीटर चढल्यावर म्हणजे एक तोरणा किल्ला चढण्या इतकी उंची ) आपण सिद्धगड वाडी  च्या प्रवेशद्वार जवळ येतो 
पुढे त्या प्रवेशद्वारापासून आत गेल्यावर डावीकडे घन दाट झाडीत  नार-माता  देवीचे एक छोटेसे मंदिर आहे आणि नंतर पुढे ती वाट "सिद्धगड ची वाडी " गावात जाते 
सिद्धगडवाडी गाव हे बालेकिल्ल्या खाली आहे आणि बालेकिल्ला अजून २०० ते २५० मीटर  उंच आहे. १५ ते २० घरांची वस्ती असलेले  हे ठाकर आदिवासी लोकांचे गाव . नारिवली गावातून या वाडीत यायला जवळ जवळ २.५ ते ३ तास लागतात 
वाटेत तुम्हाला करवंदाची , आंब्याची भरपूर झाडी दिसतील .
मोसमातील पहिला आंबा बाजारातून विकत घेता येतो पण मोसमातील पहिले करवंद खायचे असेल तर तुम्हाला डोंगरात किंवा घनदाट जंगलात जावे लागेल . मोसमातील पहिले करवंद खाण्याचे भाग्य  तुम्हाला येथे आल्यावरच लाभेल .
 वाडीतील आदिवासी लोकां बरोबर अर्धा पाउण तास  काही गप्पा गोष्टी,पाणी वगैरे झाल्यावर मग आम्ही सिद्धगडावर जाण्या साठी निघालो .त्या वाडीतील दिनेश कोकाटे हा एक कोलेज विद्यार्थी आमच्याबरोबर येण्या साठी तयार झाला 
 उन वाढू लागले होते आणि काही क्षण नंतर दाट झाडींनी साथ सोडून दिली होती .आता आमच्या समोर होता सिद्धगड चा तो बालेकिल्ला आणि रणरणते उन,तापलेले खडक आणि जवळ जवळ ९० डिग्री  च्या कोनातून उभा असलेला सिद्धगडचा  प्रचंड कडा आणि त्यातून करायची असलेली खडी चढाई
आता मात्र एका बिकट वाटेवरून सिद्धगड ला जावे लागणार होते कारण सिद्धगडवाडीतून दिसणाऱ्या भेदक सिद्धगडाच्या कड्या वरून आम्हाला त्या किल्ल्यावर प्रवेश मिळणार होता हे कळल्यावर तर आमचा उत्साह आणखीन दुणावला कारण जवळ जवळ रोक क्लैम्बिंग चा थरार अनुभवायला मिळणार होता 
एका बाजूला अंगाला घासणारा कडा आणि दुसर्या बाजूला  खोल दरी आणि त्यातून जाणारी  वाट हि कधी फुट दोन फुटाची होतो तर कधी वीत भर .
कधी खडकात कोरलेल्या पायऱ्या तर कधी कातळात कोरलेल्या खोबण्या यांचा आधार घेत  आम्ही पुढे चालू  लागलो 
त्या निसनीच्या (घसरडी आणि अरुंद याला निसनीची वाट म्हणतात ) वाटेवरून  कसेबसे सावरत आम्ही पहिल्या गुहे पाशी पोहोचलो .येथे एक साधू १० वर्षे राहत होता पण आता ती गुहा रिकामी आहे .म्हणून आम्ही आमच्या  bag आणि नको असलेले जड साहित्य या गुहेत ठेवून दिले 
या गुहे जवळ दोन मोठ्या भरलेल्या पिण्यालायक पाण्याच्या  टाक्या आहेत (मे महिन्याच्या उन्हाळ्यात देखील थंडगार स्वच्छ पिण्याचे पाणी असते ).तिथून पुढे आम्ही निसनी च्या वाटेवरून पुढे जात काही ठिकाणी पायर्या तर काही ठिकाणी निघून आलेला मुरूम,माती आणि एका बाजूला कायम असणारी खोल दरी वगैरेचा सामना करत सांभाळत शेवटी सिद्धगड च्या माथ्यावर  आम्ही चार जण पोहोचलो 
सिद्धगड च्या माथ्यावर पोहोचल्यावर मात्र आपला आनंद गगनात मावेनासा होतो सगळीकडे गर्द हिरवे पसरलेले  जंगल ,समोर भीमाशंकर चे होणारे लोभसवाणे दर्शन ,भीमाशंकर ते दमदम्या ते आहुपे - गोरख गड आणि दुर्ग ढाकोबा,दर्या घाट  पर्यंत पसरलेले अफाट भीमाशंकर अभयारण्य ,भीमाशंकर-घोनेमाळ  च्या डोंगराचे सह्याद्री वरून खाली कोकणात  उतरणारे कडे आणि माथेरान माहुली पर्यंत पसरलेली डोंगर रंग ,खाली दिसणारे  जाम्बुर्डे धरण आणि सिद्धगड आणि भीमाशंकर च्या मध्ये दिसणारे हुतात्मा भाई कोतवालांचे समाधी स्मारक हे सगळे दृश्य  बघून  झाल्यावर ४ ते ४.५  तास केलेली पायपीट सार्थक झाल्याचे वाटते  
सिद्धगड चा माथा फार मोठा विस्तृत  नाही अर्ध्या तासात तो बघून होतो .वास्तविक आता त्या गडावर फक्त अवशेष शिल्लक आहेत.
माथ्यावर पूर्व दिशेला उघड्यावर एक शिवलिंग आणि नंदी आहेत  आणि पश्चिम दिशेला गडाची कमान आणि शिल्लक अवशेष पाहायला मिळतात आणि त्या कमानीतून आत गेल्यावर असे दिसते कि पेशवाई पर्यंत येथे काही वाडे असावेत  कारण त्याचे भग्न अवशेष येथे दिसतात  ३ पाण्याचे मोठ्या  टाक्या आहेत आणि काही छोट्या पाण्याच्या टाक्या  पण आहेत  आणि जवळ सावली साठी काही दाट झाडी पण आहेत

गड पाहून झाल्यावर आम्ही काळजीपूर्वक उतरून पुन्हा गुहे जवळ आलो, आमचे ठेवलेले समान पुन्हा घेतले, आणि त्या गुहेजवळून पाणी भरून घेतले. कडक उन्हाळ्यात  देखील ते पाणी थंडगार  होते .
पुन्हा आम्ही सिद्धगडवाडी च्या गावकर्यांचा निरोप घेऊन नारिवली कडे निघालो 
दुपारचे ३:४५  वाजले होते त्यामुळे त्या दाट झाडीतून पुन्हा  जात शेवटी ६:१५ पर्यंत नारिवली गाव गाठले  अशा प्रकारे सकाळी १०:०० वाजता सुरु केलेला खडतर ट्रेक ६:३० पर्यंत समाप्त झाला 
पुढे मग नेरळ मार्गे कर्जत करत १२:०० पर्यंत घरी पोहोचलो(१ ते १.५  तास नेरळ मध्ये ट्राफिक जाम आणि जेवणासाठी ३० ते ४५ मिनिटे धरून )

Some photos

Siddhagad(982 meters) from the base village Narivali



Entering into the Bhimashankar forests near Siddhagad
 



Myself


Kiran
 
Kiran's Father in Law
    
Into the dense forests of Siddhagad



Heading towards Siddhagad through dense forests



Damdamia the neighbour of Bhimashankar and Siddhagad


Entrance of Siddhagad chi Wadi


Kiran at the entrance


The route going to Bhimashankar.This photo is from the entrance shown in above picture.Siddhagad and Bhimashankar has common trek route from Narivali village and from this point,towards left is Bhimashankar(15 kms) and Siddhagad to right through the entrance(Ofcourse not seen in picture because the photo is taken from there)


Reached Siddhagad chi Wadi village below the balekilla of Siddhagad after 2.5 hours of walking


The final climb from the Siddhagad Wadi to Balekilla


You have to climb straight from this rock patch to reach Siddhagad top



A look at Damdamia mountain and the dense forests from where we came through till here



A view of Ahupe Ghat and Gorakhgad.We came through all the dense forest seen in between the valley.That valley is 600 meters deep but due to dense trees,you cant even imagine that there is a deep valley below the tree cover
 

A close view of forests around Siddhagad and Ahupe



The first cave you encounter.Till recent a Sadhu stayed for almost 10 years.Near this cave,you can get drinking water throughout the year



Rock patch to be climbed like this

                                     
Kiran with his father in law at second cave
                                      

Finally reached the top


A view of Bhimashankar mountain to your front


Mountain Dew Darr key aagey hi jeet hai


The remains of fort on the top


Do you want this??? then come to Siddhagad during the Karvand season.You will get it in ample amount.I was lucky to get the season's first karvand here