Into the forests of Koyna - Jawali Madhugad Makarandgad Trek
Thanks to haphazardness of forest department at Bamnoli.They
don’t tell the people about whether permission to trek vasota is
denied/permitted unless and until you visit personally.
After visiting Bamnoli forest office,we came to know that
Koyna wildlife sanctuary is closed till 9th may on account of
counting tigers and hence other than forest department,nobody is allowed to
enter koyna forests(even the minister for forest department).We decided to go
on Chakdev /Maldev but again these spots behind the Koyna WLS were under the
forest department hence it is possible only after May 9th
We memorized some spots nearby like Kaas Pathar,Sajjangad
etc to see them and return home but
since we want to trek in dense forests ,we rejected them because there is crowd
on these spots.
We were almost on our way to Pune and I just remembered that
from Bamnoli,there is a way to Mahabaleshwar via Tapola and one name came in my
mind and that was Madhu-Makarandgad into the dense forests of Jawali near
Mahabaleshwar.
So on banks of Koyna at Bamnoli, finally we planned
Madhu-Makarandgad
It was 2:00 pm then we headed towards Mahabaleshwar and
after 2 hours of long journey, we reached Mahabaleshwar.Since the group had
participants from CDAC,we managed to get a government guest house just before
Pratapgad hence we decided to do our camping there.
Into the full moon light in the premises of the guest
house,we cooked food
Next morning,we headed to Makarandgad from the rest house.
It was a good journey in the forests of Jawali
and we reached there till 10:00 amWe reached the fort top around 1:00 pm and returned back to the base till 5:00 pm and started our journey towards Pune to reach home till 11:00 pm
The further narration in Marathi
आम्ही सर्व जन खरे तर वासोटा नागेश्वर साठी होतो पण सातारा - कास मार्गे बामणोली मध्ये आल्यावर कळले कि कोयना अभयारण्यात वाघांची गणती चालली आहे त्यामुळे ते अभारायान्य गिर्यारोहक ,पर्यटक यांच्या साठी 9 मे पर्यंत बंद राहणार आहे आणि कोठल्याही प्रकारची परवानगी देण्यात येणार नाही (अगदी वन मंत्र्यांची शिफारस देखील चालणार नाही )
शेवटी करायचे काय असा विचार आला .एवढ्या लांबून आलो आणि ते हि जंगलातला ट्रेक करण्यासाठी पण आता तर आमच्यापुढे माणसांच्या गर्दीचा महापूर असलेला सज्जनगड कास तलाव या शिवाय काहीच पर्याय वाटत नव्हता कारण इतर सर्व ठिकाणे वन खात्यात असल्यामुळे परवानगी अभावी जाता येणे कठीण होते
अचानक मला एक गडाची आठवण झाली म्हणजे आणि ती म्हणजे जावली च्या घनदाट अरण्यात महाबळेश्वर प्रतापगड च्या पाठीमागे वसलेल्या मधु मकरंदगड
महाबळेश्वर वरून नेहेमी सूर्यास्त बघतांना सूर्य ज्या घोड्याचा खोगीर सारख्या दिसणाऱ्या डोंगराच्या मागे मावळतो तोच डोंगर म्हणजे मधु - मकरंदगड या किल्ल्यांची जोडी
मग शेवटी आम्ही दुपारी 2:00 वाजता बामणोलीहून निघालो आणि तापोळा मार्गे महाबळेश्वर पर्यंत 5:00 वाजून गेले होते आणि त्यानंतर प्रतापगडाच्या फाट्याजवळ एक सरकारी गेस्ट हौस मिळाले
त्या रात्रीचा मुक्काम आम्ही गेस्ट हौस मध्ये केला , मग त्या आवारात चूल मांडून जेवण बनवणे आणि ते पण चांदण्या रात्री मोकळ्या आकाश खाली
नंतर मग दुसर्या दिवशी आम्ही सकाळी 7:30 वाजता मकरंदगड कडे निघालो
मकरंदगड कडे जायचे कसे ??
महाबळेश्वर कडून प्रतापगड कडे जाताना प्रतापगड फाट्या च्या 3 कि मी अगोदर कोयना नदीवर एक पूल लागेल तो ओलांडला कि थोडे पुढे लागेल पार फाटा लागेल तेथून डावीकडे वळून त्या रस्त्याने चातुर्बेत या गावी पोहोचणे .हेच गाव म्हणजे मकरंदगड चे पायथ्याचे गाव
या गावापर्यंत महाबळेश्वर हून बस ची व्यवस्थित सोय असल्यामुळे या गावापर्यंत महाबळेश्वरहून एक तासात तुम्ही या गावापर्यंत पोहोचू शकतात .पुढे या गावापासून 2 कि मी एक डांबरी रस्ता गेला आहे आणि तो डांबरी रस्ता जेथून संपतो तिथून उजवीकडे एक पाउलवाट सरळ मकरंदगड च्या खाली वसलेले घोणसपूर या जंगमांची वाडी वस्ती असलेल्या गावापर्यंत गेली आहे त्या वाडी पर्यंत आपल्याला 2 तास पायपीट करावी लागते (जवळ जवळ 8 कि मी )
पण हि पाउलवाट जावली च्या घनदाट जंगलातून असल्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही
घोणसपूर गावातून मग तीव्र चढण चढत आपण 1 तासात गडाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो
पण घोणसपूर पासून ते गड माथ्या पर्यंत झाडी थोडी कमी झाली आहे त्यामुळे येथे उन्हाचा त्रास मात्र होतो
मकरंदगड वरती किल्ल्याचे भग्न अवशेष आहे आणि तटबंदी जवळ जवळ नाहीच कारण ती ढासळलेली आहे त्यामुळे गडावर पुरातन शिवमंदिर (मल्लिकार्जुन मंदिर) ज्याची प्राणप्रतिष्टा स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली जावली च्या मोरेंचा पराभव केल्यावर
आज त्या मंदिराची पुनरुभारणी हात्लोट गावाचे श्री मोरे कुटुंबीयांनी 1990 मध्ये केली
मकरंदगडाचे दोन भाग आहेत घोणसपूर हून समोर तो मकरंदगड आणि डावीकडे तो मधुगड पण सध्या मधुगड ला जाता येत नाही कारण कोयनेच्या भूकंप नंतर तिथे जाण्याचा मार्ग ढासळला होता त्यांमुळे आपल्याला फक्त मकरंदगडाला जाता येते
मकरंदगडाच्या पठारात एक पाण्याचा तलाव पण आहे जो सबंध घोणसपूर गावाला पाणी पुरवतो (पण त्याची वात आम्हाला सापडली नाही )
मकरंदगडावरती पोहोचल्यावर तुम्हाला उत्तरेला महाबळेश्वर प्रतापगड पासून ते पश्चिमेला महीपत गड आणि दक्षिणेला मालदेव ,वासोटा ,चकदेव आणि कोयनेचे विशाल खोरे आणि जावलीचे घनदाट जंगलाचे दृश्य दिसते
त्यामुळे या किल्ल्याचा उपयोग त्या काळी कोयना आणि जावली वर लक्ष ठेवण्यासाठी नक्कीच असणार या बद्दल काहीच संभ्रम नसावा
त्यामुळे वासोटा जरी नाही पाहता आला तरी देखील वन्य प्राण्यांनी भरलेल्या जावली खोर्यात मकरंदगड भटकंती जंगल ट्रेक चा चांगला आनंद नक्कीच देते
Day 1 photos From Satara-Kaas-Bamnoli route
Suman |
Sarvanan |
Sridhar |
Bamnoli near backwaters of Koyna |
Full moon seen from our campsite |
Full Moon |
Cooking at our campsite been done |
Next Morning before our departure to Madhu-Makarandgad
Jitesh |
Pranav |
Abhishek |
Myself with Pratapgad in Background |
400 years old bridge built on Koyna River by Chatrapati Shivaji Maharaj.This bridge used to be important in those times for communication purpose in Jawali region |
View of Makarandgad while start of trekking |
Twin tops of Makarandgad(Left) and Madhugad(Right) Together known as Madhu-Makarandgad |
View of makarandgad from Chaturbet village |
View of Mahabaleshwar region on way to Makarandgad |
View of Koyna Backwaters on way to Makarandgad |
Trek Route |
The trek route through dense trees of Jawali |
Thick forests of Koyna Jawali region |
Ghonaspur village on top of Makarandgad |
We had our lunch at this house |
On top of Makarandgad |
Mallikarjun Shiv mandir on top of Makarandgad.It was built by Shivaji Maharaj and recently renovated by More family of Hatlot Poladpur taluka Raigad district |
Details of mallikarjun Shiv mandir |
Samadhi on top of Makarandgad.Basically the Jangam people residing on top of forts build tombs of their forefathers |
Makarandgad top |
View of Maldev ,Vasota ,Chakdev, Mahipatgad while climbing Makarandgad |
Just before end of trek |
Sudarshan with his new Recipe Leaves Kabab/Patta Kabab |
Whats this |