Harishchandragad trek from Malshej Ghat near Khireshwar (खिरेश्वर ) village
एक अतिशय अविस्मरणीय ट्रेक
म्हणजे जसे वारकरी लोक आळंदी - पंढरपूर ची वारी नित्यनियमाने करतात तसे दुर्ग यात्रींची पंढरी म्हणजे हरिश्चंद्रगड
महाकाय अजस्त्र हरिश्चंद्र गडाचा(१४२९ meters) ट्रेक केला आणि तो सुद्धा अगदी कमी वेळात म्हणजे सकाळी ७ वाजता घरून निघालो ,माळशेज घाटातल्या खिरेश्वर गावात सकाळी १०:०० वाजता दाखल झालो,
माळशेज घाटात माझ्या बायकोचा भावाची भेट झाली. त्यांचे कुटुंब माळशेज घाट पाहण्या साठी कल्याणहून आले होते त्यामुळे मी माझ्या बायकोला त्यांच्याबरोबर सोडले आणि मी हरिश्चंद्र गडाच्या ट्रेक ला निघालो
१०:३० वाजता ट्रेक ला सुरुवात केली, दुपारी १:०० पर्यंत मंदिरा पर्यंत पोहोचलो ,केदारेश्वर च्या बर्फ सारखे थंड पाण्यात अंघोळ केली,कोकण कडा पहिला ,पुन्हा दुपारी ३:०० पर्यंत मंदिरा जवळ आलो , फक्त तीन लाडू खाल्ले आणि परत परतीच्या वाटेवर लागलो ,वाटेत बालेकिल्ला पाहिला आणि ४:४५ पर्यंत खिरेश्वर गावात परतलो आणि घरी ९:१५ ला पोहोचलो
मागच्याच आठवड्यात केलेली रायगड ची सहल आठवली आणि या सध्या सहली साठी किती वेळ झाला हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते
हरिश्चंद्रगड ट्रेक म्हणजे रायगडचा १० - १२ पट जास्त चालणे म्हणजे जवळ जवळ ३०-३२ kilometer चालणे,भरपूर खडी चढण, खूपच दाट निर्बीड अरण्य म्हणजे कित्येकदा मला दुपारी सुद्धा torch चालू करून जावे लागत होते, फसव्या वाटा आणि त्यात मी एकटा ट्रेक करत होतो , रायगडाच्या २.५ पट चढाई (खिरेश्वर गाव ते बालेकिल्ला ८०० meter उंच.रायगड तर जमिनी पासून फक्त ३५० meter उंच आहे आणि वर जाण्या करिता त्यावर पायर्या आहे . हरिश्चंद्र गडा बाबत असलं काही नव्हत )
एवढ करून देखील मी घरी ९:१५ वाजता पोहोचलो जेव्हा कि पुणे ते रायगड आणि पुणे ते माळशेज हे अंतर जवळ जवळ सारखेच आहे आणि रस्त्यांची अवस्था सारखीच आहे , रायगडला तर मी सकाळी ६;०० वाजता निघालो म्हणजे एक तास आधी आणि तरी पण घरी पोहोचायला मला रात्रीचे १२:०० वाजले जेव्हा कि महाकाय ,अजस्त्र हरिश्चंद्रगड(रायगडाच्या १० ते १२ पट जास्त अवघड, खूप अवघड वाट ) असून देखील मी घरी खूप लवकर पोहोचलो
खिरेश्वर गाव हे फिल्म च्या शूटिंग साठी प्रसिद्ध आहे.
मणिरत्नम च्या रावण चित्रपटाचे शूटिंग इथेच झाले म्हणजे त्या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले ते निर्बीड अरण्य हे खिरेश्वर,माळशेज, हरिश्चंद्रगड ते रतनगड या भागात शूटिंग केली होती आणि मी ट्रेक करत असताना मला ती गोष्ट स्पष्ट जाणवली कि मणिरत्नम ने हीच जागा का निवडली असेल
खिरेश्वर गाव हे तिथल्या दही साठी पण प्रसिद्ध आहे म्हणजे तिथला माणूस सांगत होता कि मणिरत्नम जर इथे जवळपास आला तर न चुकता खिरेश्वर गावात येतोच .त्याला या गावातल दही फार आवडत असे इथले लोक सांगतात
हा संपूर्ण भाग कळसुबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यात येतो
खिरेश्वर गावातल्या लोकांचे कौतुक जितके करावे ते कमीच आहे मी एकटा ट्रेक करत होतो आणि काही वेळात एक ७० - ७५ च्या जवळपास वय असलेल्या तरी पण चेहऱ्यावर एक विलक्षण वेगळेच तेज असणाऱ्या आजीबाई त्या दाट रानात भेटल्या .त्यांच्याशी बोलताना असे कळले कि त्यांना गडाच्या पलीकडच्या कोथळे या गावात त्यांच्या भावाकडे फक्त निरोप देण्याकरिता जायचे होते( पुढच्या आठवड्यात राजूर ला भरणाऱ्या बैलांच्या बाजार मध्ये खरेदी संबंधी ) पण कोथळे गावात जायचे म्हणजे पुन्हा माळशेज रोड वर जाऊन ST पकडून ओतूर ला जाऊन दुसरी ST पकडून ब्राह्मणवाडा -कोतूळ ला जावे लागते आणि मग पुन्हा आणखीन ST किंवा जीप ने कोथळे ला जावे लागते म्हणजे वेळ भरपूर लागतो आणि पैसा हि त्या पेक्षा हि १९ kilometer ची पायपीट परवडती
मी थक्क झालो , आहो या वयात देखील त्या आजीबाई त्या दाट रानातून आणि एका साध्याशा कामासाठी एकट्या १९ kilometer ची पायपीट करून कोथळे गाव कडे चालल्या होत्या .
मी एक गोष्ट observe केली म्हणजे कि त्या आजींच्या बोलण्यात कुठेही negative बोलण्याचा अजिबात लवलेश नव्हता न कुठल्याही प्रकारची भीती आणि विशेष म्हणजे त्यांच्या हातात काठी देखील नव्हती. त्या आजी सामान्य नव्हत्या असे का बर मला वाटत होते कोणास ठाऊक
तोलार खिंड आली आणि त्या आजीबाई कडून "सांभाळून जा मुला " असे आशीर्वाद वजा प्रेमळ बोल ऐकून निरोप घेतला . मी त्या खिंडीत थोडा वेळ थांबलो आणि काही क्षणात दाट राना मधून त्या आजीबाई केव्हाच दिसेनासे झाल्या म्हणजे आता इथे होत्या आणि पुढे झाडीतून कुठे गेल्या हे समजले नाही.
तोलार खिंड आली म्हणजे १ तास कठोर मेहेनत करून तुमचा ट्रेक २५ टक्के झाला असे समजायचे .हरिश्चंद्रगड आणि कारकाई डोंगर या मधील हि खिंड या खिंडीतून भरपूर वाटा फुटतात .अतिशय दाट झाडीतून डावी कडे हरिश्चंद्रगडा कडे वाट जाते ,आणि उजवीकडे सरळ हि वाट कोथळे , विहीर ,कोहोने, लव्हाळी गावाकडे जाते
तोलार खिंडीत मी हरिश्चंद्र गडाला जाणारी डावीकडची वाट धरली ,अरण्य खूपच दाट होते म्हणजे मी खिरेश्वर गावातून १ तास या दाट झाडीतून चालत आलो होतो पण डोक्यावर आकाश दिसणे हि गोष्ट पण खूपच क्वचित पणे घडत होती
थोडे पुढे आलो आणि खूप वेळाने आकाश दर्शन झाले आणि तेव्हाच माझ्या समोर एक २०० फुटाचा कडा आ वासून उभा होता .त्या कड्या मधून वाट काढत एका डोंगर माळेवर दाखल झालो
समोर एक रुळलेली पाउल वाट दिसत होती आणि खूप दूरवर मला हरिश्चंद्र गडाचे तारामती शिखर दिसत होते . या डोंगर माळेवरून मला सात डोंगर चढून उतरून मंदिरापर्यंत जाता येते हि गोष्ट कळली .इथे वाट चुकण्याची काहीच शक्यता नाही कारण तुम्हाला ठराविक अंतरावर चहा,लिंबू सरबत,ताक विकणारे लोक सापडतील पण आता मंदिर जवळ जवळ ८ kilometer लांब आहे आणि वाट कधी दाट निर्बीड अरण्यातून तर कधी ओसाड माळरानावरून जाती आणि त्यात खूपच फसव्या वाटा असतात म्हणजे तुम्ही कुठेही वाट चुकलात कि हात पाय आपटून भोकाड पसरले तरी ऐकायला जवळपास कोणी नसते(अपवाद फक्त जंगली प्राण्यांचा ) म्हणून वाट चुकणार नाही याची काळजी घेणे खूपच आवश्यक आहे.
माझ्या १ किलोमेतर पुढे एक ट्रेक करणार्यांचा ग्रुप अधून मधून दिसत होता त्यामुळे या वाटे बद्दल खात्री होती
इथे ताक लिंबू सरबत विकणाऱ्या लोकांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे .सगळे लोक जवळच्या कोथळे, लव्हाळी, कोहोने,पेठाची वाडी गावातून एवढी पायपीट करून येतात हे एक आश्चर्य आहे कारण या वाटेवरून खूप कमी लोक फिरकतात तरी देखील हे लोक येथे ताक, सरबत विकायला येतात .त्यांचा उद्देश एकाच असतो कि इथे येणाऱ्या लोकांना वाट दाखवावी आणि ते हि पैश्यांची मागणी न करता म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून तक सरबत घ्या अथवा नका पण ते तुम्हाला योग्य रस्ता दाखवतीलच याची खात्री आहे ( या भागात जवळ जवळ सर्व लोक माळकरी आहेत त्यामुळे त्यांना महाबळेश्वर, माथेरान , लोणावळा ,खंडाळा,भीमाशंकर,भंडारदरा इत्यादी सारखे "पैसे घेतल्याशिवाय काहीही सांगायचे नाही" चे वारे नाही लागले अजून ) .ताक सरबत विक्री तर त्यांच्या साठी गौण विषय आहे .
त्यामुळे सगळीकडे चांगला अनुभवच येतो
त्यांना धन्यवाद देत आपण आपल्या वाटेने चालू लागायचे
त्या रुळलेल्या पाउल वाटेवरून,त्या अरण्यातून, माळरानातून डोंगरवाटा तुडवीत कधी चढण तर कधी उतरण करीत मी चालू लागलो आणि जवळ जवळ १.५ तासांनी सातवा डोंगर चढल्यावर मंदिर दृष्टीक्षेपात येऊ लागले आणखीन ५ मिनिटांनी मंदिर गाठले.
वास्तविक पाचनई ची वाट खूपच सोपी आहे आणि त्या वाटेवरून एका रुळलेल्या मोठ्या पाउलवाटेने( राजमार्गच म्हणा ना ) फक्त ५०० meters चढून आपण १.५ तासात मंदिरापर्यंत पोहोचतो पण पाचनई पर्यंत पोहोचणे पुण्यापासून सोपे नाही .म्हणजे तुम्हाला पुण्याहून ओतूर- ब्राह्मणवाडा -कोतूळ- कोहोने -लव्हाळी मार्गे पाचनई पर्यंत पोहोचावे लागते म्हणजे जवळ जवळ ४.५ ते ५ तास.
पुण्याहून माळशेज घाट मार्गे खिरेश्वर जवळ पडतो पण या वाटणे हरिश्चंद्रगड फार अवघड आहे आणि लांब लचक आहे पण या वाटेने गेलात तर तुमचे संपूर्ण हरिश्चंद्र गडाचे भ्रमण होते .
आणखीन एक खूपच अवघड वाट आहे आणि ती म्हणजे माळशेज घाट पूर्ण उतरल्यावर कोकणात सावरणे गावात उतरून बेलपाडा या गावात जाणे आणि 'नळीच्या वाटेने' जवळ जवळ ११०० meter ची कोकण कड्यावरून चढाई करून तुम्ही मंदिरा पर्यंत येऊ शकता पण या वाटेने यायला तुम्हाला १० ते १२ तास लागतात अर्थात हि वाट नवख्या लोकांच्या आवाक्या बाहेरची आहे हे कळले असेलच एव्हाना .
दुपारी १:०० वाजे पर्यंत म्हणजे २.५ तासात मी मंदिराजवळ पोहोचलो (साधारण या मार्गे ट्रेक ला ४ तास लागतात असे बरेच ट्रेकच्या संबंधित websites सांगत होते पण गावातील लोक अगदी बरोबर सांगत होते .खिरेश्वर गावातून एका माणसाने मला २ ते २.५ तास लागतील हे अगदी बरोबर सांगितले होते )
सातव्या डोंगराच्या वाटेवरून तुम्ही खाली उतरताच त्या वाटेला पाचनई गावाकडून येणारी वाट मिळते आणि मग येथून उगम पावणाऱ्या मंगलगंगा च्या ओढ्यावर एक सेतू ओलांडून आपला प्रवेश मंदिरात होतो .हि नदी पुढे जाऊन पाचनई गावाजवळ मुळा नदीला मिळते
इतक्या अवघड जागी हे सुंदर आणि भव्य मंदिर १०,००० वर्षापूर्वी या निर्बीड जंगलात कसे बांधले असेल याचा विचार करू लागलो
या हरिश्चंद्रगडावर ज्ञानेश्वर माउलींच्या समकालीन संत चांगदेव महाराजांचे वास्तव्य होते आणि त्यांनी इथेच तपश्चर्या केली होती. चांगदेव महाराजांबद्दल येथे काही शीलालेख आढळतात पण त्या साठी काही माहितगार लोकांना विचारावे लागेल
वटेश्वर चक्रपाणी चांगदेव महाराजांनी याच हरिश्चंद्रगडावर 'तत्वसार' लिहिले होते आणि त्याचे शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ आढळतात
हरिश्चंद्रगडावर तारामती शिखरात तुम्हाला ९ लेण्या दिसतील त्या मुक्काम योग्य आहेत म्हणजे जर एका वेळी १०० ते २०० लोक इथे मुक्काम करू शकतात इतका भव्य हा किल्ला आहे
आणि या पुरातन मंदिराच्या मागे कोकण कड्या कडे जातांना तुम्हाला टेकडी वरती एक छोटीशी देऊळी दिसेल त्याला विश्वामित्राने बांधलेली "डोंबची घुमटी" असे म्हणतात
म्हणजे हा किल्ला किती पुरातन आहे याची कल्पना तुम्हाला आली असेलच .म्हणजे स्कंद पुराणात पण " हरीश्चान्द्राय नामे पर्वतः " असा उल्लेख आढळतो
इतिहासात तुम्ही बघाल तर हा किल्ला शिवाजी महाराजांकडे पण नव्हता आणि मुघल लोकांकडेही .या गडाची जागा अशा अवघड ठिकाणी होती कि कोणालाच याचा पत्ता नव्हता.म्हणजे १६७१ च्या सुरत च्या लुटी नंतर शिवाजी महाराज हे शेजारच्या कुंजर गडावर (याला पेठाची वाडीजवळ कोंबड किल्ला अस म्हणतात ) राहिले होते आणि नंतर नाणे घाट जीवधन उतरून कल्याण मार्गे रायगड ला रवाना झाले होते
१७ व्या शतका मध्ये(सन १७४७) मुघल लोकांना हरिश्चंद्र गडाचा पत्ता लागला होता पण लगेचच सहा महिन्याच्या आत हा किल्ला पेशव्यांनी मुघलांकडून जिंकून आपल्या ताब्यात घेतला आणि बालेकिल्ल्यावर तटबंदी केली आणि तिथे एक किल्लेदार नेमला(आज या बालेकिल्ल्याचे काही अवशेषच शिल्लक आहेत ) . पुण्या-मुंबई कडे तुम्हाला हरिश्चंद्रे किंवा हरिश्चंद्रकर आडनावाचे लोक सापडतील ते मुळचे कोकणामधील चिपळूण चे जोशी पण पेशव्यांनी नेमलेले किल्लेदार म्हणून त्यांचे आडनाव हरिश्चंद्रकर जोशी असे झाले
या कोकण कड्या बाबत एक किस्सा असा आहे कि कोकणातील जोशी यांनी आपली मुलगी जुन्नर मध्ये दिली होती आणि एके दिवशी जुन्नर मध्ये त्यांनी पेशव्यांची दवंडी ऐकली कि जो माणूस त्या रौद्रभीषण कोकण कड्यावरून किल्ल्यात येईल त्याला हरिश्चंद्र गडाची किल्लेदारी देण्यात येईल आणि त्या प्रमाणे श्री जोशींनी तो महाकाय कोकण कडा चढला आणि हरिश्चंद्र गडाची किल्लेदारी मिळवली.
पुढे सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला
ताजमहालाला "seven wonders of world " असे म्हणतात पण तुम्ही हरिश्चंद्र गडावर या आणि हे पुरातन मंदिर बघा ताजमहाल या मंदिरापुढे खूपच फिके आहे(अगदी कीस झाड कि पत्ती) म्हणजे ताजमहालाचे या मंदिराबरोबर कुठल्याही शब्दात आणि कुठल्याही रुपात,कुठल्याही दृष्टीकोनातून तुलना करताच येणार नाही. हो पण या मंदिरा कडे येताना खूप सारे कष्ट सोसण्याची तयारी हवी(अगदी पाचनई च्या सोप्या वाटेने सुद्धा कष्ट करावे लागतात ) . इतक्या सहजपणे तुम्हाला इकडे येत येणार नाही . हरिश्चंद्र गडावर यायचे म्हणजे कष्टा शिवाय पर्याय नाही
मंदिरात दर्शन घेवून खाली केदारेश्वर मंदिराकडे गेलो आणि आज खूप कमी लोक गडावर होते याचा फायदा म्हणून कमरेपर्यंत बर्फा सारख्या थंड पाण्यात उतरून केदारेश्वराचे दर्शन घेण्याचे ठरवले आणि मी त्या पाण्यात उतरलो आणि त्या पाण्यात उतरलो तर ते पाणी इतके थंड होते कि एका क्षणात मला पाय आहेत कि नाही असे वाटू लागले कमरेपासूनचा खालचा भाग बधीर झाला होता .त्या पाण्यात अंघोळ करून मी पुन्हा बाहेर आलो आणि इतका वेळ वाजणारी थंडी कोठे पळून गेली हा प्रश्न मला पडू लागला .
खडी चढण आणि १२ kilometer ची पायपीट यामुळे आलेला थकवा केदारेश्वर च्या थंड पाण्यात अंघोळ केल्यावर केव्हाच नाहीसा झाला होता .
कपडे बदलून मी पुन्हा हरिश्चंद्रेश्वर मंदिरात आलो आणि bag मधून भूक लाडू काढले (राजगिरा लाडू ) आणि थोडे खजूर खाऊन पाचच मिनिटात कोकण कड्या कडे निघालो
कोकण कडा हा मंदिरापासून साधारण २ ते २.५ kilometers आहे पण मला ५ वाजायच्या आत खिरेश्वर गावात पोहोचायचे होते म्हणून आता पायाला चाक लावणे भागच होते .१५-२० मिनिटात मी कोकण कड्यापर्यंत पोहोचलो आणि कोकण कडा जिथे संपतो तिथ पर्यंत जाऊन आलो,काही फोटो काढले आणि पुन्हा मंदिरात २० मिनिटात आलो
तीन वाजत आले होते आणि मला निघणे भागच होते कारण एक अशक्य गोष्ट करायची होती आणि ती म्हणजे जिथे ३ तास लागतात ती गोष्ट २ तासात करायची होती म्हणजे पायथ्याच्या खिरेश्वर या गावात जाणे
मंदिरात असणाऱ्या पाण्याच्या टाक्यातून मी माझ्याकडील ३ पाण्याच्या बाटल्या भरून घेतले,हरीशचंद्रेश्वर चे पुन्हा दर्शन घेतले आणि परतीच्या वाटेवर निघालो
मंदिरा बाहेर मला एक चांगलीच जाड आणि ५ फुट लांब काठी सापडली .पुढे मी एका ताक विकणाऱ्या माणसाकडून त्या काठीला तासून भाल्या सारखे टोक करून घेतले .
आता मी निर्धास्त होतो कारण ती काठी अशी होती कि एका फटक्यात कुठल्याही जंगली जनावराचा कपाळमोक्ष करण्यासाठी (आणि तासून धारदार केल्यामुळे कोथळा बाहेर काढण्यासाठी पुरेशी होती) आणि त्या दाट अरण्यात मला हवा असलेला short cut सापडला वास्तविक त्या सात डोंगराची चढण आणि उतरण करण्यात २ तास जाणार होते आणि या short cut ने बालेकिल्ल्यावरून जाऊन खाली उतरून सरळ तोलार खिंडीत जाता येते आणि ते हि अर्ध्या तासात पण हि वाट खूपच भयानक दाट झाडीतून जाते आणि त्यातून मी एकटा होतो पण काही हरकत नाही कारण दाट झाडीतून जर वाट असेल तर वाट चुकण्याची शक्यता कमी असते कारण मला माहित होते कि कितीही फसव्या वाटा आल्या तरी पण मला डावीकडेच जायचे होते म्हणजे वाट चुकली तरी पण डावीकडे जात गेलो तर मी त्या सात डोंगरांच्या वाटेला तर निश्चित लागेल
पण त्या दाट झाडीतील वाट खूपच सोपी निघाली म्हणजे दोन्ही बाजूने खूपच दाट झाडी,कुठेही त्या वाटेला फाटा फुटत नव्हता म्हणजे वाट चुकण्याची शक्यता नव्हती
त्या वाटेवरून मी बालेकिल्ल्याचा डोंगर चढलो आणि उतरलो आणि एका डोंगराच्या माळ्यावर पोहोचलो आणि परत दाट झाडीतून वाट काढत, उतरत बरोबर अर्ध्या तासात मी त्या कड्या जवळ आलो .
माझा जवळ जवळ १.५ तास वाचला होता याचा आनंद झाला
एक गोष्ट मनाशी बांधली कि कोठेही थांबायचे नाही .पायाला चाक कायम लावलेले पाहिजे आणि म्हणूनच मंदिरापासून जे सुरुवात केली ती मी खिरेश्वर गावापर्यंत कोठेच थांबलो नाही कारण मला माहित होते कि २ ते ५ मिनिटे जरी थांबलो कि पुढे अजून time pass करण्याची सवय लागेल आणि नंतर दाट अरण्यात अंधारात चालण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. आता माझ्या जवळ १.५ तास वाचल्याचा advantage होता आणि त्याचा फायदा हा घेतलाच पाहिजे या विचाराने मी चालू लागलो .मला खाली उतरणारा एक माणूस सुद्धा दिसला नाही .फक्त तोलार खिंडीत राहणारे ताक लिंबू सरबत विकणाऱ्या लोकांखेरीज मला पहिला माणूस दिसला तो खिरेश्वर गाव अगदी १०-१५ मिनिटावर आले होते तेव्हा
२०० फुट कडा उतरून मी तोलार खिंडीत दाखल झालो आणि परतीची वाट धरली आणि जवळ जवळ १ तासांनी मी खिरेश्वर गावा जवळ आलो वाटेत माळरानात एक कोल्हा दिसला होता पण मी माझी काठी अशा थाटात त्या खडकावर आपटली कि त्या आवाजाने त्याने जी धूम ठोकली तो पुन्हा कधी दिसला नाही
बालेकिल्ल्या जवळ माळरानात मला एक साळींदर दिसले होते पण कॅमेरा काढे पर्यंत ते कोठे एका बिळात गेले आणि तिथे पुष्कळ बिळे होती
तरासाचे खिदळण्याचे आवाज येत होते पण आता गाव अगदी पाच मिनिटावर आले होते आणि तरस मला काही नवीन नाही. हल्ली तर लहान पोर देखील तरसला हुसकावून लावतात
खिरेश्वर गावात आलो आणि सगळी नातेवाईक मंडळी गावात थांबली होती .एक मराठी फिल्म ची शूटिंग चालली होती संध्याकाळ चे ४:४५ झाले होते मग आपला थोडा आराम केला गावात दोन छोटे हॉटेल आहेत ,तिथे थांबून चहा घेतला ,
गावकर्यांशी थोड्या गप्पा झाल्या आणि इथे कोठल्या फिल्म ची शूटिंग झाली होती इथपासून ते हरिश्चंद्रगड पूर्वी कसा होता आणि आता ट्रेक ला येणाऱ्या लोकांनी त्याला कसा खराब केलाय या बद्दल चर्चा झाली (मला एका कोलेज च्या तरुण मुला मुलींचा मुंबई कडचा ग्रुप दिसला होता हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ त्यांचे मद्यपान ,धुम्रपान आणि मोबाईल वर जोर जोरात गाणी लावणे इत्यादी प्रकार सर्रास चालले होते.एक बरे झाले कि गावकर्यांनी त्यांना हुसकावून लावले आणि या फालतू लोकांनी पाचनई गावाची वाट धरली )
वास्तविक या असल्या फालतू लोकांमुळेच डोंगरयात्रा करणाऱ्या लोकांची टिंगल टवाळी आणि माकड चेष्टा इतर बरेच लोक करतात
मी इतक्या कमी वेळात कोकण कड्या पर्यंत जाऊन परत आलो या गोष्टीवर गावात कोणाचाही विश्वास बसत नव्हता पण मी जेव्हा फोटो दाखवले तेव्हा त्यांना खरे वाटले. आहो कोकण कडा सोडा,मी तर जवळ जवळ साढले घाटा च्या जवळ पास गेलो होतो म्हणजे कोकण कडा आणि ती नळीची वाट जिथून सुरु होते तिथपर्यंत
माळशेज घाटामध्ये सूर्यास्ताचे दृश्य कॅमेर्यात टिपून निघालो .म्हणजे आम्ही पुण्याला आणि आमचे नातेवाईक कल्याण ला
नाशिक हायवे ला भरपूर ट्राफिक होती,शिवाय जेवणासाठी थोडा वेळ थांबलो होतो तरी पण ९:१५ मिनिटांनी मी घरी सुद्धा आलो (म्हणजे एक साध्या रायगड ट्रिप च्या तुलनेने हा तर एक चमत्कारच म्हणावा लागेल )
Here is a guidance map for Harishchandragad trek prepared by me
This map is for guidance purpose only.It has nothing to do with exact dimensions and distance
Here are some photos
Harishchandragad from Malshej Ghat.This fort spans around 10 to 12 kms.Just look from right to left.This much vast mountain is Harishchandragad
From Khireshwar village,the trek starts.Between the two mountains is the Tolar Khind.From here,left is the way to Harishchandragad
You have to trek through such dense trees for almost all the trek
Approaching the Tolar Khind
There is a rock patch of 200 feets from Tolar Khind.After climbing this rock patch,you have to travel seven mountains through very very dense forests to reach Harishchandragad temple
या कड्या मध्ये खोबण्या आहेत आणि लोखंडी खांब बसवले आहेत आणि त्यातूनच वाट कडून हा कडा चढावा लागतो (सोपी श्रेणी, फक्त चढताना खाली बघू नये )
After climbing the rock patch.view of Karkai dongar(करकाई डोंगर ) 1488 meters fifth highest mountain in Maharashtra
After the rock patch,you have to travel through seven hills through dense forests like this
View of Ghanchakkar(Left-1532 meters) and Muda(Right-1520 meters) third highest and fourth highest mountains in Maharashtra
खूप चालून झाल्यावर हरिश्चंद्रगड बालेकिल्ला(समोर डावीकडे ) आणि तारामती(बालेकिल्ल्या शेजारचे ) शिखर दिसायला लागते .इथून मंदिर अजून १ तास लांब आहे आणि अजून ५ डोंगर चढून जायचे आहेत
On the way to Harishchandragad
After walking for 2.5 hours,here is the first sight of the temple
This is the 10,000 year old temple the Harishchandreshwar temple
मंदिराजवळ पोहोचे पर्यंत २.५ ते ३ तासाच्या पायपिटीने एकदम घामेघूम झालो होतो .चला केदारेश्वरच्या बर्फा सारख्या थंड पाण्यात अंघोळ केली पाहिजे !
Caves inside the temple
Kedareshwar temple immersed in ice cold water
Harishchandreshwar temple,It is believed to be 10,000 years older(एक प्रश्न असा पडतो कि अशा अवघड जागेवर हे एक सुंदर कलाकृती असलेल मंदिर कसे उभारले असेल.आग्र्याच ताजमहाल पण खूपच फिक पडेल या मंदिरा समोर. दर्शनी भागात गणपतीची मूर्ती आणि आतल्या गाभ्यात शिवशंकराची पिंड असे हे मंदिर आहे)
पुष्करणी तलाव (या तलाव मध्ये भगवान विष्णूंचे १४ वेगवेगळे आयुधे धारण केलेल्या मूर्ती आहेत )
केदारेश्वर च्या गोठवणाऱ्या पाण्यात कशीतरी अंघोळ केली .कमरे पर्यंत असलेल्या पाण्यात शिरताच तुम्हाला पाय आहेत कि नाही असा प्रश्न पडतो आणि हे पाणी अगदी मे महिन्यात सुद्धा एवढेच थंड असते
हरिश्चंद्रगड चा सुप्रसिध असलेला कोकण कडा.खाली टाकलेली हलकी वस्तू पुन्हा वर येती . हा कडा ४००० फुट खोल आणि ३ kilometer लांब आहे . हा सह्याद्रीतला सर्वात उंच कडा आहे
कोकण कडा
Myself at Kokan Kada
हा तो कोकण कडा.कितीही प्रयत्न केले तरी हा संपूर्ण कडा अखंड पणे कॅमेर्यात टिपता येत नाही इतका उंच आहे .जो दिसतो आहे तो अर्धाच आहे .अजून अर्धा कडा सरळसोट खाली शिल्लक आहे .तुम्हाला कल्पना आली असेलच कि हरिश्चंद्रगडाला येणारा प्रत्येक माणसाला या कड्याचे आकर्षण का आहे .हा कडा तुम्ही बघितला नाही तर तुमचा हरिश्चंद्रगडावर येऊन काहीच उपयोग होणार नाही किंबहुना तुमच्या सारखा अरसिक माणूस जगात दुसरा कोणी नसेल
कोकण कड्यावरून दिसणारे माळशेज घाट आणि नाणे घाटाचे दृश्य
एका वेगळ्या कोनातून रौद्रभीषण कोकण कड्याचे टिपलेले छायाचित्र (हा फोटो कसा घेतला असेल याची कल्पना करा )
कोकण कड्यावरून दिसणारे हरिश्चंद्र गडाचे संपूर्ण पठार.लांब दिसणारा तो बालेकिल्ला आणि समोर जवळ दिसणारे ते तारामती शिखर
परती च्या वाटेवर हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला
पुन्हा हा कडा २०० फुट उतरायचा आहे
खाली दिसणारे कोथळे लव्हाळी गाव
परतीच्या वाटेवर तोलार खिंडीत
खिरेश्वर गाव
माझी काही photography try केली
माझी काही photography try केली
माळशेज घाटातला सूर्यास्त
माझी काही photography try केली
पिंपळगाव जोगे धरण
माझ्या साठी हरिश्चंद्रगड म्हणजे स्वर्गाहून श्रेष्ठ असे एक ठिकाण आहे म्हणजे पुनर्जन्म,आत्मा, स्वर्ग, नरक वगैरे गोष्टी जर सत्य असतील तर मी म्हणेल कि मला पुनर्जन्म नको आणि स्वर्ग तर मुळीच नको .मला स्वर्गा पेक्षा श्रेष्ठ जागा या पृथ्वीवर मिळाली आहे. मी शरीराने जगाच्या पाठीवर कोठेही असलो तरी पण आत्म्याने मी कायम हरिश्चंद्रगडावर असेल
हरिश्चंद्रगड आहेच मुळी तसा

फोटो व वर्णन छानच आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मी व माझा भाऊ ९५ साली दोघेच सप्टेंबर महिन्यात येथे गेलो होतो.
ReplyDeletenice writeup
ReplyDeleteभाऊ, छान माहिती दिली धन्यवाद.
ReplyDelete