धाडसी लोकांचा अत्यंत जवळचा
वाटणारा , नाथ संप्रदायाचा गोरखगड
महाराष्ट्रात कित्येक असे
किल्ले आहेत कि जे उत्तुंग उंची ,बेलग बुलंद कडे,भव्य दिव्य कामगिरी चे साक्षी
असलेले आहेत पण फार लोकांना परिचित नसलेले काही डोंगरी किल्ले ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आदिवासी
गावांमध्ये आहेत जसे कि नारिवली जवळचा ‘ आकाशाला भिडलेला सिद्धगड ‘ ,’ खोपावली
जवळचा आहुपे घाट रस्ता ’ आणि देहरी गावा जवळचे दोन सुळके ‘गोरखगड आणि मच्छिंद्रगड ‘ ,धसई जवळचे दुर्ग आणि ढाकोबा
गोरखगड ला जायचे कसे
पुण्याहून
पुण्याहून दोन ठिकाणहून
जाता येते
१)
कर्जत पर्यंत रेल्वे ने आणि
नंतर तेथून मुरबाड कडे सारख्या बस चालू असतात कर्जत हून मुरबाड ला जाणारी बस पकडून
४० कि मी अंतरावरील म्हसा या गावी उतरावे आणि तेथून देहरी गाव करिता जीप किंवा बस
मिळतात
२)
पुणे हून बस ने माळशेज
मार्गे टोकावडे ला उतरावे(म्हणजे पुणे हून आळे फाटा ला उतुरून मुंबई ला जाणारी
कोणतीही बस पकडली कि टोकावडे ला पोहोचता येते) आणि टोकावडे गावातून तुम्हाला देहरी
ला पुष्कळ बस मिळतील
देहरी गावातून
तुम्हाला समोरच गोरख-मच्छिंद्र चे भयाण सुळके आणि त्या मागे आहुपे घाट ,दक्षिणेला थोडे
लांब भला मोठा सिद्धगड तुम्हाला दर्शन देतो आणि उत्तरेला तुम्हाला दुर्ग ढाकोबा
,जीवधन नाणे घाट चे पण दर्शन होते
तर पहिले देहरी
गावात आल्यावर एक काम करायचे कि तिथल्या सरपंचांना भेटावे लागते आणि एका पुस्तकात
आपले नाव,गाव,पत्ता आणि फोन नंबर लिहावा लागतो कारण गेल्या काही काळात हे दोन
सुळके चढतांना दुर्घटना / अनिष्ट घटना झाल्या आहेत त्यामुळे तिथल्या सरपंचांनी
येणाऱ्या प्रत्येकाचे तपशील नोंद करून घेण्याचे ठरवले आहेत तसेच गड चढून परत
आल्यावर पण त्यांना भेटावे लागते .
मी किल्ल्याकडे एकटा
निघालोच होते तेव्हा पुण्याहून आलेली मंडळी देहरी गावात भेटली आणि त्यांच्या बरोबर
मी निघालो
तर देहरी गावापासून
सुरुवात केल्यावर्ती तुम्हाला थोडे मागे एका पुला पर्यंत परत जावे लागते आणि तिथून
एक गोरक्षनाथांचे मंदिर दिसेल त्या मंदिरा मागून एक पाय वाट लागते तोच गोरख गड पर्यंत
जाणारा मार्ग .मार्ग तसा धोपट आहे आणि जरी येथे घनदाट जंगल असले तरी पण चुकण्याची
काहीच शक्यता नसते .या वाटेने चालत अर्धा पाउण तासात पहिला टप्पा संपतो तो
आपल्याला बरोबर गोरख मच्छिंद्रच्या सुळक्याच्या खाली आपल्याला घेऊन जातो. येथून
खडी चढण सुरु होऊन वाट एका अतिशय दाट जंगलातून आपल्याला घेऊन जाते .खडी चढण
संपल्यावर सुळका बरोबर आपल्या डोक्यावर असतो पण सरळ न जाता उजवीकडे पुन्हा त्या
घनदाट जंगलात उजवीकडे थोडे चढून तर थोडे उतरून एका झापा जवळ येऊन पोहोचते . येथे
उघड्यावर एक शिवलिंग आणि खडकात कोरलेले
पादुका तुम्हाला दिसतील. इथे हेच वैशिष्ट्य आहे कि अगदी घनदाट जंगलात पण कोण
अज्ञात शिल्पकाराने केलेले हे अद्भुत शिल्प नजरेस पडते. या शिव्लिंगी पासून डावीकडे
आता सरळ सुळक्या जवळ जायचे असते त्यामुळे या ठिकाणी थोडी विश्रांती केल्यास चांगले
होते कारण येथून पुढे बिकट वाट सुरु होते . “सर्व काही सहज सोपे करता येत असते हा
समज आता येथून नाहीसा होते “. नवख्यांसाठी मात्र येथून पुढे वाट खूपच महा कर्म
कठीण त्यामुळे त्यांनी येथूनच माघार घेतली तरी काहीच हरकत नाही
पुढे दगड धोंड्यातून
वाट काढत तर कधी खडकात कोरलेल्या पाय्र्यातून आणि एका अवघड टप्प्यातून आपण हा
सुळका जवळ जवळ काटकोनात चढायला लागतो आणि आपल्याला समोर खडकात कोरलेला गडाचा
दरवाजा दिसू लागतो येथे पोहोचण्यास आपल्याला अर्धा तास लागतो .
दरवाज्यातून आत
आल्यावर आपल्याला समोर रौद्रभीषण आहुपे घाटचे एक मनोहारी रूप बघायला मिळते जे फक्त
गोराख गडावरूनच बघायला मिळते .समोर आहुपे घाटाचा अवाढव्य पसरलेला डोंगर ,गोरख –
आहुपे मधील खोल दरी ,दूर लांब दिसणारे दुर्ग-ढाकोबा,जीवधन आणि सिद्धगड,आपण एका
सरळसोट सुळक्या च्या माधोमद आहोत आणि खाली येथ पर्यंन्त येणाऱ्या पायर्या
बघितल्यावर तर असा विचार देखील येतो कि आपण येथे कसे पोहोचलो ? कारण या आपण जवळ
जवळ काटकोनात(Almost 90 degrees climb ) वर चढत आहोत त्यामुळे ज्यांना उंचीचा त्रास आहे त्यांनी या
पायर्या चढतांना खाली न बघितले बरे .
येथे आम्ही जेवण केले
आणि पुढे एका गुहेत आमच्या पाठपिशव्या येथेच ठेवून दिले कारण पाठीवर वजन घेऊन जवळ
जवळ काटकोनात चढता येणे अशक्य असते कारण आता वाट येथून अजून बिकट होणार आहे याची
जाणीव होती पुढे आणखीन खडकात कोरलेल्या अवघड पायर्यांनी चढून एका गुहे जवळ आपण
येऊन पोहोचतो . हि एक भव्य आणि प्रशस्त गोरक्षनाथांची गुहा या अवघड ठिकाणी आहे .हि
गुहा मुक्काम योग्य आहे . येथे काही ट्रेकर मंडळींनी साबण ,मीठ मसाला ,चूल ,
भांडी इत्यादी ठेवली आहेत .येथून जवळच पाण्याच्या टाक्या आहेत
या गुहे पासून पुढे जवळ जवळ कातळरोहणाचे तंत्र
वापरावे लागते कारण अगदी जेमतेम पाउल मावेल अशी पायर्यांची वाट आणि पाठीमागे खोल
दरी त्यामुळे खूपच सांभाळून चढणे .हि फुफाटा ची वाट पार केल्यावर शेवटी आपण त्या
उंच सुळक्यावर येऊन पोहोचतो .
वर सुळक्यावर खूप
कमी जागा आहे आणि सर्व बाजूने तासून असलेले कडे आणि त्या अवघड जागी गोरक्षनाथांचे
मंदिर आणि ३ औदुम्बाराचे झाड आहेत .
गोरख गडा च्या सुळक्या वरती खूप जास्त जागा नाही एक समाधी मंदिर, ३ औदुंबराची झाडी आणि खाली सगळ्या बाजूने सुटलेले बेलग कडे ,समोर दिसणारी सह्याद्रीची अभेद्य फळी आणि प्रचंड वेगाने वाहणारे वारे
येथे येणारा रस्ता थोडा बिकटच आहे कारण पक्षीच येथ पर्यंत पोहोचू शकतात असा हा मार्ग आहे
सुळक्या वरून लांबवर नजर
टाकली कि तुम्हाला सिद्धगड ,भीमाशंकर ,आहुपे घाट ,दुर्ग-ढाकोबा ,नाणे घाट ,
जीवधन ,आजोबा पर्वत इत्यादी दिसेल
तो सुळका काळजीपूर्वक उतरून
पुन्हा १.५ तासात देहरी गावात पोहोचलो
 |
देहरी गावातून दिसणारे गोरखगड (डावीकडे ) आणि मच्छिंद्र गड उजवीकडे |
 |
गोरखगडा कडे जाणारी वाट |
 |
आहुपे घाट |
 |
सिद्धगड |
 |
आहुपे घाट , दुर्ग आणि दूर दिसणारे ढाकोबा चे शिखर |
 |
पहिला टप्पा पूर्ण झाला |
 |
या कातळाला वळसा घालून चढावे लागते . |
 |
दाट जंगलात शिवलिंग आणि पादुका .खोपावली गावातून येणारा आहुपे चा रस्ता येथे मिळतो .खाली उतरून आहुपे कडे जाता येते आणि डाव्या बाजूस गोरखगड कडे जाणारी कातळात कोरलेली बिकट पायरी मार्ग सुरु होतो |
 |
एका अवघड पाय्र्यातून प्रवेशद्वार जवळ येऊन पोहोचलो |
 |
प्रवेशद्वारातून समोर दिसणारे आहुपे घाटाचे सौंदर्य |
 |
भुयारी मार्ग |
 |
समोर दिसणारा मच्छिंद्र गडाचा सुळका |
 |
आहुपे आणि दुर्ग-ढाकोबा |
 |
एका वेगळ्या कोनातून आहुपे घाटाचे दर्शन |
 |
कातळातून कोरलेल्या पाय्र्यातून शेवटची चढाई |
 |
मामा भांजे असे या गुहेत कोरलेल्या शिल्पाचे नावे आहे |
 |
गोरक्षनाथांची प्रशस्त गुहा |
 |
गुहेत एक दगडी चूल आहे |
 |
गुहे च्या आत मध्ये |
 |
शेवटचा टप्पा .हा फोटो anti clockwise फिरवून पाहणे .camera च्या setting मुले हा फोटो असा आलेला आहे |
 |
सुळक्यावर असलेले गोरक्षनाथाचे समाधी मंदिर |
 |
गोरक्षनाथ समाधी मंदिर .एवढ्या अवघड ठिकाणी ??? |
 |
गोरक्ष गडावरून दिसणारा "आकाशाला भिडलेला सिद्धगड " |
 |
आम्ही जेथून येथपर्यंत आलो आहोत ते गावच आता दिसत नाही |
 |
हाच तो सुळका जो आम्ही चढलो होतो आणि बघता क्षणी विश्वास पण बसत नाही कि आम्ही त्यावरती जाऊन आलो |
 |
गोरखगडाची सावली मच्छिंद्र गडावर |
 |
देहरी गावातून दिसणारा गोरख गड |
 |
परतीच्या वाटेवर दिसणारा आकाशाला भिडलेला सिद्धगड |
छान व उपयुक्त माहिती. नकाशे नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
ReplyDeletewww.ferfatka.blogspot.in