Saturday, May 11, 2013

Bhorgiri Bhimashankar Trek


Bhorgiri to Gupt Bhimashankar to Bhimashankar Trek Done on 04 May 2013

सह्याद्रीतील एका आगळ्यावेगळ्या ट्रेक बद्दल ज्यामध्ये खूप जास्त चढण नाही पण भीमाशंकर अभयारण्यातील १२ कि मी चालणे , हि वात कधी भीमा नदीच्या पात्रातून मोठमोठ्या दगड धोंड्यांनी भरलेली खडतर वात तर कधी दाट जंगलातून जाणारी वाट , कधी बैलगाडी जाईल एवढी वाट तर कधी दाट झाडीतून अरुंद पाउलवाट , लेण्या,गुहा, खळगे , सभोवताली उंच डोंगर, जिकडे बघावे तिकडे दाट अरण्य , कधी पक्ष्यांचा किलबिलाट , कधी जंगली जनावरांचे आवाज , नजरेस पडणारी दुर्मिळ शेखरू खार
या सर्व गोष्टींमुळे हा ट्रेक थरारक , रोमांचक  व कडक उन्हाळ्यात देखील एका भटकंतीला सार्थ आनंद मिळवून देतो
भोरगिरी
राजगुरूनगर पासून ५० कि मी सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भोरगिरी हे छोटेसे गाव . येथे सकाळी १० वाजे पर्यंत पोहोचण्यास एस टी बस ची सोय आहे . राजगुरूनगर हून भोरगिरीला जाणारी पहिली बस सकाळी ८ वाजता आहे आणि नंतर ९:१५ वाजता आणखीन एक बस सुटते तसेच पहाटे ४ वाजता राजगुरुनगरला पोहोचणारी मुंबई ते भोरगिरी अशी पण एक बस आहे. पण सकाळी ९:१५ नंतर मात्र बस मिळणे मुश्कील मग सगळे काही खासगी वाहने जीप या वरती आपला प्रवास अवलंबून आहे
१.५ ते दोन तासात बस ने भोरगिरी या गावात आपण पोहोचतो , गावात एक महादेवाचे मंदिर आहे , एक शाळा आहे आणि काही वस्ती आहे . समोर छोटासा भोरगिरी किल्ला दिसतो. गावातून चालू लागल्यावर साधारण १५ ते २० मिनिटात आपण एका नदीच्या खळग्या जवळ येऊन पोहोचतो . पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे येथे रांजण खळगे तयार झाले आहेत .
ते खळगे ओलांडून पलीकडे गेल्यावर एक चढण लागते आणि साधारण १० मिनिटात आपण लेण्या जवळ येऊन पोहोचतो .या लेण्यात महालक्ष्मी ची मूर्ती आहे जी चारी बाजूने थंड पाण्याने वेढलेली आहे (हरिश्चंद्रगडावर असलेल्या केदारेश्वर मंदिरा सारखी आहे) फक्त येथे पाणी जास्त खोल नाही . अगदी अर्धा फुट खोल असेल पण मे महिन्यात देखील या गुहेतील पाणी बर्फासारखे थंड आहे           
भोरगिरी ते भीमाशंकर कडे  
पुढे भोरगिरी येथे लेण्या पाहिल्यावर्ती पुन्हा गावात उतरून एक बैलगाडी चा रस्ता धरावा. थोडे पुढे गेल्यावर जंगलात वन विभागाचे एक लोखंडी फाटक लागेल ते ओलांडून पुढे याच रस्त्याने चालत राहावे. या वाटेत चढण आहे व साधारण ५ कि मी चालल्यावर तुम्हाला पुढे दोन वाटा दिसतील . येथून मुख्य वाट सोडून डावी कडची वाट धरावी . एक कि मी खाली उतरल्यावर दाट झाडी सुरु होतात  व वन खात्याची निशाणी असलेल्या दगडे तुम्हाला दिसतील येथून पुढे दाट झाडीतून मार्ग काढत खाली उतरावे आणि दाट झाडींचा टप्पा संपला कि समोर दोन डोंगर मध्ये एक छोटीशी दरी  दिसेल व खाली भीमा नदीचे पात्र दिसेल .येथून उजवीकडे चालत राहावे कधी दाट  जंगलातून तर कधी नदीच्या पात्रातून
आम्ही भीमा नदीच्या कोरड्या पात्रातून जाण्याचे ठरवले. भले मोठे खडक आणि या नदी पात्रातून चढण या मुळे ४ कि मी चालणे देखील कठीण झाले होते.शेवटी ३ कि मी चालल्यावर नदीच्या पात्रातील मोठे खडक संपले आणि चढण संपून आपण पुन्हा घनदाट झाडीत येऊन पोहोचतो . नदीचे पात्र ओलांडून झाले कि ते आपल्या डावीकडे सोडून द्यावे आणि त्या घनदाट झाडीत प्रवेश करावा .
गुप्त भीमाशंकर
नदीचे पात्र डावीकडे सोडून दिल्यावर घनदाट अरण्यात प्रवेश करून साधारण एक कि मी चालावे. थोडीशी चढण आहे या वाटेवर .एक कि मी चालल्यावर तुम्हाला डावीकडे खाली एका दगडावर पिवळ्या रंगाने बाणाची खुण केलेली दिसेल तेव्हा येथून मुख्य वाट सोडून डावीकडची वाट धरावी . येथून जरा जपून पुढे जपून जाणे कारण या टप्प्यात रान डुक्करे खूप आहेत आणि तुम्हाला त्याचा आवाज देखील येईल . या जंगलात वाट खाली जाते व पुन्हा नदी पात्राला मिळते . येथून दाट झाडीत जावे येथेच तुम्हाला नदीच्या पात्रात एका मोठ्या दगडा खाली ३ शिवलिंग दिसतील.
येथून आल्या मार्गाने परत जायच्या ऐवजी गुप्त भीमाशंकर पासून पुढे नदी पात्र ओलांडून पुन्हा दाट जंगलात जाऊन उजवीकडे वळावे तिथे एक छोटेशे गणपती मंदिर दिसेल (साक्षी विनायक गणपती मंदिर) येथून पुढे सरळ चालत गेल्यास एक कि मी तुम्ही भीमाशंकर मंदिराच्या मागे येऊन पोहोचतात (भीमाशंकर मंदिरा जवळ SBI /Bank of Maharashtra ATM च्या येथे हा ट्रेक संपतो म्हणजे या Aए टी एम पासून गावातून जो रस्ता गेला आहे तोच गुप्त भीमाशंकर कडे गेला आहे तेव्हा भीमाशंकर मंदिरा जवळ येऊन ज्यांना गुप्त भीमाशंकर बघायचे आहे त्यांनी गावात कोणालाच विचारू नये . गावातील लोक २००,३०० किंवा मनाला येईल ती किंमत घेऊन हे ठिकाण दाखवतात व फसवणूक करतात हे तुम्हाला नंतर लक्षात येईल. )

या टप्प्यात तुम्ही शांतता राखली तर शेखरू या भल्या मोठ्या खारीचे दर्शन होईल . आम्ही या बाबतीत भाग्यवान होतो कि आम्हाला दोनदा शेखरू चे दर्शन झाले (कित्येक लोकांना दोन दिवस या जंगलात फिरून देखील या मोठ्या खारीचे दर्शन होत नाही हे विशेष)
अशा रीतीने  भोरगिरी ते भीमाशंकर ची केलेली हि पायपीट सफल होते  
भीमाशंकर ज्योतिर्लिंग चे दर्शन घेऊन आम्ही एस टी ने पुण्या कडे निघालो  

Photos of trek shown below

Shiv Temple in BhorGiri village 

Last stop of ST bus

Towards Bhorgiri caves

Mahalakshmi idol surrounded by ice cold water in cave

Our Trek Members Mahesh Nitin Kiran Anirban and Rajeev

Sudarshan

Myself 

Route to Bhimashankar from Bhorgiri cave

Mahalakshmi idol in Bhorgiri cave

Mahalakshmi idol

Bahwa flowers

The trek route from Bhorgiri towards Bhimashankar

Below is the dry river bed of Bhima River.We descended down and went to Bhimashankar by the upstream route

The forest route to Bhimashankar

Dry river bed of Bhima River

Walking through Dry Bhima river bed.Very big boulders while walking upstream


Approaching Gupt Bhimashankar

Shivlingas in Gupt Bhimashankar below the rock.In monsoons,water falls over it

Directions indicating route to Gupt Bhimashankar

Sakshi Vinayak Temple near Gupt Bhimashankar

Route to Bhimashankar Temple

Bhimashankar temple seen in front

Reached near the temple



Trek Map of Bhorgiri-Bhimashankar


Near Gupt Bhimashankar in dry river bed




       



                               
                    

3 comments:

  1. Very useful information!!! Keep it up!!!

    ReplyDelete
  2. Pankaj,
    Thanks on behalf of all other trekers for taking all the efforts in writing this blog. Kep writing.

    ReplyDelete